नवी दिल्ली : बँकेत नोकरी लागणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यामुळे आता बँकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या अधिकृत वेबसाईटवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 225 पदांची भरती केली जाईल.
बँक ऑफ महाराष्ट्रने विशेष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी BoM Recruitment साठीची अधिकृच बेवसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा
अर्ज भरण्याची तारिख : ज्या इच्छुक उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या विशेष अधिकारी पदाच्या 2023 साठी अर्ज करायचा आहे, ते 23 जानेवारी 2023 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शेवटची मुदत: ऑनलाइन अर्ज 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत स्वीकारले जातील.
अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
– अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी bankofmaharashtra.in ला भेट द्यावी.
– वेबसाइटच्या होमपेजवर Career च्या लिंकवर क्लिक करा.
– यानंतर Recruitment of Specialist Officers in Scale II & III Project 2023-24 च्या लिंकवर क्लिक करा.
– पुढील पेजवरील Registration Link वर क्लिक करा.
– यानंतर मागितलेली सर्व माहिती रजिस्ट्रेशन करा
– रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
फी किती लागणार
अर्ज करण्यासाठी फी ऑनलाइन जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना फी म्हणून 1180 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय, इतर उमेदवारांसाठी 118 रुपये फी लागेल.
पात्रता आणि वयोमर्यादा
– उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे.
– यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 35 वर्षांपेक्षा कमी असावे.
– आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.