जळगाव : नूतन पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का, एमपीडीए व हद्दपारीच्या कारवायांना वेग दिला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात बावरी गँगवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे. मोक्कांतर्गत कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मोनुसिंग जगदिशसिंग बावरी (वय 23, रा.सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (वय 19, रा.सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), सोनुसिंग जगदिशसिंग बावरी (वय 25, रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), जगदिशसिंग हरिसिंग बावरी (वय 52, रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), सतकौर जगदिशसिंग बावर (वय 45, रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव) यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपींचा आता नाशिक कारागृहात वर्षभर मुक्काम असणार आहे.
आयजींनी दिली प्रस्तावाला मंजुरी
आरोपींच्या टोळीविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याने मोक्कांतर्गत कारवाईसाठी एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो नाशिक आयजींकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली.
यांनी केली प्रस्तावाची कार्यवाही
गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस अंमलदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील पंडीत दामोदरे तसेच एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार सचिन मुंडे, योगेश बारी, सचिन पाटील यांनी कार्यवाही केली.