जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव कोरोना योद्धा देशाला वाचवण्यासाठी महत्वपूर्ण काम करत असून. कोरोना काळात स्वतःचे जीव संकटात टाकून दुसऱ्याचे जीव वाचवण्याचे काम कॉंग्रेसच्या कोरोना योद्ध्यांनी केलं आहे. असे स्पष्ट प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कोरोना योद्धा कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर कॉंगेस कमिटीच्या प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अ भा. कॉंग्रेस किसान सेल चे शामजी पांडे, माजी आ. रमेश चौधरी, नीलकंठ फलक, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील,डी जी पाटील, सचिन सोमवंशी, योगेश पाटील, जि.प चे गटनेते प्रभाकर सोनवणे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, अविनाश भालेराव, राजीव पाटील, प्रदीप पवार, डॉ. केतकी पाटील आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणामध्ये बोलतांना नाना पटोले म्हणाले, कोरोना वाढीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहे. कारण कोरोनाकाळात ते अमिरेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना निवडून अनण्याचे काम पंतप्रधान मोदियांनी केले. त्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष झाले. त्याला नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेरोजगारी वाढली याचे उदाहरण देतांना त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. तेलाच्या वाढत्या महागाईला उद्योगपती आघाडी हे जबाबदार असून, देशातील महत्वाची मांडले त्यांच्याताब्यात असल्याने त्यांनी कोणताही माल येऊ दिला नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ पोहोचली देशाची आर्थिक परिस्थिती कमकुवत करण्याचे काम भाजप सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी केला. या जुलमी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता सज्ज होण्याची वेळ आली असून, भाजपा विरोधात राज्यात ठिकठिकाणी सज्ज राहण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय एन. एस. यु.आय. चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी करून दिला तर, प्रास्ताविक माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कोरोना कालावधीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याची व वैद्यकीय महविद्यायात उपलब्ध असलेल्या विविध सुख सुविधांचा उहापोह केला. तसेच करोना रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये ४०० च्या वर बेड राखून ठेवले होते. असे सांगितले.
कार्यक्रम यशश्वीतते साठी कॉंग्रेसचे पदाधिकारी जमील शेख, देवेंद्र पाटील, जगदीश गाढे, श्याम तायडे, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.