भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथून बनावट नोटा प्रकरणी शहनाज अमीन भोईटे (वय 35, पाण्याच्या टाकीजवळ, साकेगाव) व हनीफ अहमद शरीफ देशमुख (लाखोली, नाचणखेडा, ता.जामनेर) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना सुरूवातीला 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर मंगळवारी पुन्हा भुसावळ न्यायालयात हजर केले असता 30 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
साकेगाव येथे गुरूवार, 19 रोजी तब्बल 22 हजारांच्या बनावट नोटा संशयीत शहनाजच्या घरातून जप्त करण्यात आल्या होत्या तर लाखोतील आरोपीकडून 20 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपींनी बनावट नोटासाठी आणलेले प्रिंटर, स्कॅनर हे खराब झाल्याने ते दुरूस्तीसाठी जळगाव येथे टाकल्याने ते गोलाणी मार्केटमधील एका दुकानातून पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
पोलिसांच्या चौकशीत आतापर्यंत सुमारे चार लाखांच्या नोटा वितरीत झाल्याचा संशय असून त्या कुठे-कुठे वितरीत झाल्या शिवाय या प्रकारात आणखीन कोण-कोण सहभागी आहे याचा तपास तालुका पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. तपास सहा.निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.