(राजेंद्र शर्मा)
जळगाव राजमुद्रा | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागतासाठी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी जोरदार नियोजन केले होते. त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा नानामय झाल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह तर ग्रामीण भागातील कान्याकोपऱ्यापर्यंत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फलक दिसून आले. एवढेच नव्हे तर संपूर्ण गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात व परिसरात विविध ठिकाणी नाना पटोले यांच्या नावाचे फलक लावलेले होते.
पटोले यांच्या या अभूतपूर्व स्वागतामुळे प्रदेशच्या नेत्यांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. कोरोना योद्धा यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी याचा प्रत्यय सभागृहात दिसून आला. संपूर्ण जळगाव जिल्हा नानामय झाला असल्याचे उद्गार माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी काढले. कोरोनाकाळात रुग्णांची केलेली सेवा आणि रुग्णालयातील अद्ययावत सुविधा याचा उल्लेख करतांना प्रदेशच्या कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, कोरोनाकाळात डॉ. उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्याला देवदूत लाभले आहे. सतत हसतमुख राहणारे आणि रुग्णांची सेवा करणारे डॉ. उल्हास पाटील असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून कोरोनारुग्नांची सेवा केली आहे. सातःचा जीव संकटात टाकून दुसऱ्याला जीवनदान देणारे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनता कधीच विसरणार नाही अशी ग्वाही डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिवसभर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरु असलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आक्रमक पणे कार्यकर्त्यांसमोर मांडला.