जामनेर : गोद्री येथे अ.भा. हिंदू गोरबंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २५ जानेवारी पासून सुरु झाला. आज दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय कार्यालयाच्या मैदानात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून संतांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमात सकाळी १० वाजता कुंभात सहभागी सर्व साधू संत तसेच विविध राज्यातून आलेले भक्त गण, स्थानिक नागरिक, व्यवस्थेतील स्वयंसेवक, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. पू. महामंडलेश्वर अखिलेश्वरानंदजी (अध्यक्ष गो सेवा आयोग) मध्य प्रदेश यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी पु. संत बाबूसिंगजी महाराज, पू. गोपाल चैतन्य महाराज आणि संत गण ,पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.