कोविड महामारीत ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे त्या रुग्णांसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील मित्र परिवार कडून एक लाख रुपयांचा निधी पंचायत समिती सभापती मुकुंद नंनवरे यांच्या हस्ते देण्यात आला. या निधीतून कोविड रुग्णांसाठी आवश्यक वस्तू घेण्यात येणार असून कोरोना रुग्णांना यातून आधार दिला जाणार आहे.
हा निधी बंडू नारखडे, मुकेश सोनवणे, चंदू इंगळे, सरपंच चंदू माळी, उदय झंवर, पाळधीचे एपिआय गणेश बुवा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुभाष राऊत, पंकज बिर्ला, जितू शेठ, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पवार, सदाशिव पाटील आदींच्या सहकार्यातून एकत्रित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात मुकुंदराव नंनवरे यांच्यासह अरुण पाटील, मच्छिद्र कोळी, शरद कोळी, भूषण पाटील, बळीराम कोळी, अनिल माळी, योगेश सोनवणे, बाळासाहेब पाटील, पियुष पाटील, प्रतीक पाटील, सुभाष नंनवरे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर माळी, पप्पू माळी, अरविंद मानकरी, दानिश पठाण, चेतन झंवर, रवी माळी, सुधाकर माळी, गजानन ठाकूर, धनराज कासट, राहुल पाटील उपस्थित होते.