मुंबई : जर तुम्ही बँकेच्या नोकरीची तयारी करत असाल, तर तुमच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे 200 हून अधिक रिक्त जागा भरल्या जातील. ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक भरती सूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट, Centralbankofindia.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.
येथे रिक्त जागा तपशील पहा
मुख्य व्यवस्थापक: 50 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक: 200 पदे
एकूण रिक्त पदांची संख्या – 250 पदे
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून संबंधित विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स (CAIIB) परीक्षा आणि उच्च पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. मुख्य व्यवस्थापक पदासाठी वयोमर्यादा 40 वर्षांपेक्षा कमी आणि वरिष्ठ व्यवस्थापकासाठी वय 35 वर्षांपेक्षा कमी असावे. याशिवाय 5 ते 7 वर्षांचा अनुभव मागवण्यात आला आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक तपशीलांसाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल. परीक्षा द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असेल. ऑनलाइन परीक्षा मार्च 2023 मध्ये (तात्पुरती) घेतली जाईल.
अर्ज फी
इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 850 + GST भरावा लागेल. SC/ST/PWBD उमेदवार/महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.
पगार किती मिळणार (पे स्केल)
MMG स्केल III: रु.63840-1990(5)-73790-2220(2)-78230 पर्यंत
SMG स्केल IV: रु.76010-2220(4)-84890-2500(2)-89890 पर्यंत