रावेर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसें आरोप करण्यापेक्षा निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिक्षण करावे. माझ्यावर सत्यजीत तांबे यांना मदत करण्याचा आरोप आ. खडसे यांनी सिद्द करून दाखवावे, असे अवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी दिले आहे.
नासिक पदवीधर निवडणुकी दरम्यान काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी व डॉ. उल्हास पाटील यांनी निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम न करता, अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना मदत करण्याचा आरोप राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांनी केला होता. यावर आमदार शिरीष चौधरी यांनी प्रतिउत्तर दिले. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुढे आ. शिरीष चौधरी म्हणाले की, महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराचेच आपण कामे केले आहे. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी जे निर्णय घेतले आधी त्याचे परीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते खडसे?
नाशिक पदवीधर संघ निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम न करता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना मदत केली, असा आरोप राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला होता. यावर आमदार शिरीष चौधरी यांनी आरोपाला रविवारी रावेरात प्रतिउत्तर दिले आहे.