जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कांचन नगर परिसरातील दीपक भट यांच्या घरासमोरील गायीची रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास चोरी झाली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कांचन नगर परिसरात रहिवासी असलेले दीपक भट यांच्या गाईची अज्ञातांनी रात्री सव्वा दोनच्या सुमारास चोरी केली आहे. सदर गाय याज्ञीकी करून गुजराण करणाऱ्या दीपक भट यांच्या मालकीची असून त्यांच्या घरासमोरील गोठ्यातील बांधलेली होती. दरम्यान ही गाय मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या बाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.