जळगाव : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, सन 2019 ते 2023 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवत संशयीत आरोपीने पिडीतेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. मुख्य संशयीत आरोपीच्या सांगण्यावरुन इतर तिघांनी तिला मारहाण व शिवीगाळ केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर हे करत आहेत.