जळगाव : शहरासाठी महत्वाकांक्षी असलेली अमृत योजना अजूनही पुर्णत्वास जावू शकली नाही. यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरु असतानाच याचा प्रकल्प सादर करता न आल्याने शासनाने योजनते वगळल्याचे पत्र दिले होते. या योजनेचा प्रकल्प अहवालासाठी एजन्सी नियुक्तीच्या प्रस्तावावर हा विषय रेंगाळलेला आहे. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणात लक्ष्य घातले असून, एजन्सी नियुक्तीबाबतचा लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते.
अमृत २.० योजना जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून १२०० कोटी रूपयांची तरतूदही आहे. त्यासाठी मनपाने प्रकल्प अहवाल एका एंजन्सी मार्फत तयार करून शासनाला पाठवायाचा आहे. एजन्सीची नावेही शासनाने दिली आहेत, त्यातील एकाला हे काम द्यावयाचे आहे. परंतू एजन्सी कोणाला नेमायची यावरून च सत्ताधारी, विरोधक तसेच मनपा प्रशासनात एकमत न झाल्याने महापालिकेडून एजन्सी नियुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अमृत २.० योजनेच्या विकास आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ला काम द्यायचे की दुसऱ्या एजन्सीला नेमावे यासाठी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दखल घेत पालकमंत्री यांच्याकडे लवकरच याबाबत बैठक होणार आहे.
लवकरच तोडगा काढणार
अमृत २.० योजनेच्या प्रकल्प विकास आरखाडा तयार करण्याच्या एजन्सी नेमणूक बाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लवकरच बैठक होणार आहे. बैठकीस आमदार, मनपाचे पदाधिकारी, अधिकारी यांची मजीप्रा अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेवून यावर तोडगा काढला जाणार आहे.