जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालात केंद्रसरकारच्या कृषी कायद्याचा कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन दहन केले. याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असून, असे सांगुण भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या हस्ते दहन करण्यात आले. यावेळी आ. प्रणिती शिंदे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.