जळगाव: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ मैदान) येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राज्यपाल कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. तसेच कोश्यारी हे जळगाव दौऱ्यावर आले असता, काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनाना अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगर तर्फे जल्लोष करण्यात आला. यावेळेस कोश्यारी यांची वेशभूषा साकारली होती, त्यांना प्रतिकात्मक निरोप देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, अमोल कोल्हे, राजू मोरे, किरण राजपूत, भगवान सोनावने, रहीम तडवी, रमेश बाऱ्हे, सुशील शिंदे, साहिल पटेल, रफिक पटेल, नरेंद्र शिंदे, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, योगेश कदम, चंदन कोळी, योगेश साळी, सचिन साळुंखे, आकाश हिरवाडे, हितेश जावळे, विनोद धुमाळे, विशाल देशमुख,जुबेर खाटीक आदी उपस्थित होते.