जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ जामनेर तालुक्यातील जागा मित्र पक्षाकडे दिल्या आहेत मात्र त्या ठिकाणी विरोधी उमेदवारापेक्षा अधिक मताधिक्क्य कॉंग्रेसला असल्याने, या जागा कॉंग्रेसला सोडाव्यात वेळप्रसंगी, जामनेरातील जागा कॉंग्रेसला मिळाल्यास भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांना घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिला आहे.
भुसावळ येथील रामानंद मंगल कार्यालयात आयोजित पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कॉंग्रेसला मोठा इतिहास आहे, गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कॉंग्रेसला भुसावळ आणि जामनेरची जागा मिळावी अशी मागणी डॉ. उल्हास पाटील यांनी केली आहे. व्यासपीठावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेशकार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, आ. शिरीश चौधरी, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आ. नीलकंठ फालक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुनवर खान, अविनाश भालेराव, वीरेंद्रसिंह पाटील, रवींद्र निकम, युवक जिल्हाध्यक्ष मितेश पाटील, जोत्स्ना विसपुते आदी उपस्थित होते.