जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पालिकेच्या गाजलेल्या बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी केलेली राजकीय खेळी व हालचाली जोरात सुरु झाल्या आहे. यात सर्वात मोठी अडचण ठरलेल्या भाजपचे गटनेते भगत बालाणी असल्याचे एका शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेत सुरु असलेल्या राजकीय घटना नाट्यमयरित्या सुरु झाले असल्याचे महापालिकेतील सभागृहात नागरिकांच्या हिताचे प्रश्न मांडणारे भगत बालाणी सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांना मोठी अडचण ठरत आहेत. कारण भाजपाचे व्हीप बजावतांना त्यांची भूमिका महत्वाची असते. सत्तांतराच्या कालावधीत त्यांनी बजावलेला व्हीप भाजपातून शिवसेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांना त्रासदायक ठरणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जर गटनेता अपात्र ठरला तर चांगले होईल. अशी व्यूहरचना शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली असून, यासाठी राज्यस्तरावर वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरु आहे.