जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने काही दिवासंपूर्वी नेरी नाका स्मशानभूमी कोरोनाने मृत झालेल्या मृतांवरच अंत्यसंस्कार करण्यासाठी आरक्षित केली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता नेरीनाका स्मशानभूमीत सर्वप्रकारच्या कारणांमुळे मृत्यू झालेल्या मृतांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे, असे आदेश मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी काढले आहेत. तसेच, याठिकाणी चार ओटे कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.