(राजमुद्रा, जळगाव) रामेश्वर कॉलनी या भागात हातमजुरी करणाऱ्या रेखा भालेराव या महिलेच्या घराला आग लागून त्यात घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू व घरातील जमा करून ठेवलेली रक्कम आगीत भस्मसात झाली होती. हातावर पोट असणाऱ्या या महिलेचा संपूर्ण संसार राखरांगोळी होऊन जगण्याचा आधार हरवला होता या महिलेची परिस्थिती लक्षात घेता मदतीचा हात पुढे करत सामाजिक बसंधीलकी म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषणभाऊ पाटील परिसरातील नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या मदतीने घरातील लागणाऱ्या आवश्यक वस्तू या महिलेला देऊ करण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना महिला अध्यक्ष शोभाताई चौधरी, शिवसेना महिला मनिषाताई पाटील आदींची उपस्थिती उल्लेखनीय होती.
आधीच कोरोना काळामुळे हलाखीची परिस्थिती असताना सदर महिलेचा संसार उद्ध्वस्त झाल्याचे दुःख लक्षात घेऊन ही आवश्यक मदत त्या गरीब महिलेला करण्यात आली असल्याचे परिसरातील नगरसेवक प्रशांतभाऊ नाईक यांनी सांगितले.