जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्य पोलीस भरती २०१८ मध्ये प्रतीक्षायादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाले असून त्यांना सेवत रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी केली आहे.
यासंदर्भात उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत समाविष्ठ करून बेरोजगार शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षे झाली असून आठशे पोलीस भरतीतील उमेदवार शासनाच्या दरबारी पाठपुरावा करीत असून शासन काही तांत्रिक अडचणी सांगून न्याय देत नाही. याबाबत गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे तरी अद्याप न्याय मिळाला नाही आहे. प्रतीक्षायादी खुली करून पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात यावे. काही उमेदवार वयातून बाद झाले आहे. त्यामुळे दुसरी भरती देणे शक्य नाही बेरोजगार युवकांचे भविष्य अंधारात असून ते नैराश्यात जात आहेत. आपत्ती व्यवस्थापासाठी नैसर्गिक व महामारी साठी ठेवलेली प्रतीक्षा यादीत रिक्त जागा असून देखील का खुली होत नाही, असा सवाल उमेदवारांनी केला आहे. यावेळी दिगंबर महाजन, यश पाटील, हेमराज सपकाळे, प्रवीण पाटील, अक्षय बविस्कर, विकास पाटील, हंसराज गायकवाड, महेश पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.