जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | अ.भा बी.एस.एन.एल च्या जिल्हा संघटनेच्या वतीने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी निदर्शने करण्यात आली. जळगावच्या बी.एस.एन.एल महाप्रबंधक यांच्या कार्यालयाजवळ कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा देत निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महाप्रबंधक यांना देण्यात आले. संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
बी.एस.एन.एल संघटनेच्या मागण्या खालील प्रमाणे.
मागील दोन वर्षापासून बी.एस.एन.एल मधील कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन वेळेवर दिले जात नाही मे २०२१ चे वेतन अद्याप मिळाले नाही. ते त्वरित देण्यात यावे. यापुढे दर महिन्यचे वेतन वेळेवर देण्यात यावे यांची हमी देण्यात यावी. बी.एस.एन.एल ला फोर जी स्पेक्ट्रम देण्यात यावे, डी ओ टी कडे बी.एस.एन.एल चे करोडो रुपये घेणे बाकी आहे ते त्वरित घेण्यात यावे. बी.एस.एन.एल हि देशभरात सर्वात स्वस्त दूरसंचार देणारी एकमेव सरकारी कंपनी आहे. देशातील दुर्गम तसेच खेड्यापाड्यात तोटा सहन करून सेवा देत आहे. त्या मोबदल्यात सरकार कुठल्याही प्रकरची मदत करत नसून उलट सरकार खासगी कंपन्यांना सरळ हाताने मदत करून. सरकारी कंपनीला व कार्म्चार्यंना संपवण्याची नीती अवलंबत आहे. या निदर्शनात संघटनेचे निलेश काळे, सचिन झाल्टे, बी पी सैंदाणे, केतन जाधव, एस जी कासार, विकास बोंडे, शशिकांत सोनवणे, शालिक पाटील, प्रदीप चांगरे, अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला.