(राजमुद्रा, जामनेर) राष्टीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपशब्द वापरून अपमानित केल्या संदर्भात कारवाई करून चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जामनेरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते संजयदादा गरुड, राजेंद्र पाटील, किशोर पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन जामनेर तहसीलदार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रवाना केले असून चंद्रकांत पाटील यांनी काही कारण नसतांना भुजबळ यांच्या विरोधात अपशब्द वापरून जेष्ठ नेत्यांचा अपमान केला आहे. ही बाब गांभीर्याने घेत भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.