जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ” जो पर्यत ओबीसी आरक्षण मिळणार नाही तो वर भाजप कडून राज्यभर आंदोलन सुरू राहील ‘ असा पवित्रा रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी घेतला आहे, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे, जळगाव जिल्ह्यात देखील खा. रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलने करण्यात आली आहे. शहरातील आकाशवाणी चौकात भाजपने संपूर्ण चक्का जाम केला होता यावेळी आ.राजुमामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाले होते.
https://fb.watch/6mGznMQvAu/
ओबीसी आरक्षणावरून न्याय मिळत नाही तो पर्यत निवडणुका घेण्यात येऊ नये तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी देखील खा. रक्षा खडसे यांनी केली आहे. यावेळी परिवहन विभागाच्या बसेस भाजप कार्यकर्त्यांनी रोखून ठेवल्याने संपूर्ण महामार्गाची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
आंदोलन फसविण्याचा प्रयत्न
खा. रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण करीता आंदोलन सुरू असताना काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पोलिसांसोबत शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले , रस्ता अडवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले मात्र यावेळी भाजप कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसून आले आहे. तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची चांगलीच वाताहत झाली होती.