अमळनेर राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप कडून ओबीसींचे सरकारी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आज भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा प्रदेशउपाध्यक्षा स्मिता वाघ यांनी केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. याचा निषेध करण्यासठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती स्मिता वाघ यांनी दिली. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.