दोंडाईचा राजमुद्रा वृत्तसेवा | संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या वतीने ट्युशन शुल्का मध्ये ५०% सवलत मिळावी आणि महाविद्यालयातील अनावश्यक विभागाचे शुल्क रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे केली आहे. दोंडाईचा काँग्रेस पदाधिकारी व कार्याकर्त्यांच्या बैठकीत ते आले असता, त्यांना विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, कोव्हीड-१९ मुळे वर्षभरापासून टाळेबंदीची परिस्थिती आहे. याकाळात अनेक पालकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक व्यवसाय ठप्प झाले आहेत. अश्या परिस्थितीत काही महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या महाविद्यालयीन शुल्कात वाढ केली आहे. त्यानुसार वसुली केली जात आहे. या वाढीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष उपभोगत नसलेल्या विभागांच्या शुल्काचा देखील समावेश आहे. तरी शासनाने अनावश्यक विभागाचे शुल्क रद्द करावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी संयुक्त विद्यार्थी संघटनेचे जनसंपर्कप्रमुख प्रशांत भट, दीपक जगदाळे, निरंजन करंके , मयुरेश जैन, आकाश राजपूत, प्रेमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.