मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | शेतकऱ्यांतर्फे लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आणि शेतकरी संघटनांनी राष्ट्रपतींच्या नावे रोष पत्र लिहून राज्यपाल यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी राष्ट्रपतींना रोषपत्राद्वारे करण्यात आली.
दिनांक २६जुन २०२१ रोजी शेतकरी आंदोलनाला ७ महिने पूर्ण झाले. २५ जून १९७५ साली देशातल्या आणीबाणीला ४६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील शेती, शेतकरी आणि लोकशाही वाचवण्याची दोन आव्हाने जनतेसमोर उभी ठाकली आहे. कृषी विरोधी तीन काळे कायदे शेतकऱ्यांवर लादले गेले. हे तिन्ही कायदे संविधानास लक्षात ठेऊन बनवले गेले नाही. यामुळे सर्व आंदोलक शेतकरी व कृषी कायदे विरोधी मोर्च्याच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रपतींना तीन कायद्या संदर्भात रोषपत्र लिहिले आहे. कृषी आंदोलनातर्फे राज्यपालांना प्रतिभा शिंदे, आ. अबू आझमी, शेकाप चे एस व्ही जाधव, किसान सभेचे महेंद्रसिंग, विश्वास उडगी, सुरेश माने आदि उपस्थित होते.