जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आज जळगाव शहरात भाजपा कडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलना प्रसंगी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली.
आंदोलनापेक्षा भाजप नेते खा. रक्षा खडसे, आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत उभे राहून भाजपचे कार्यकर्ते सेल्फी काढण्याचा आनंद घेत असल्याचं दिसून आले. विशेष म्हणजे, यात महिला देखील मागे राहिल्या नाहीत. त्यांनी देखील खा. रक्षा खडसे यांच्यासोबत सेल्फी काढून आपली हौस भागवली. याप्रकाराने उपस्थित जनतेने आश्चर्य व्यक्त केले आहे.