जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’, हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित केला जातो. दरम्यान जळगावच्या भाजपच्या मंडळात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपाच्या बळीराम पेठेतील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, मन की बात कार्यक्रमाचे प्रमुख विठ्ठल पाटील, प्रा. सिंग, भगतसिंग निकम, प्रकाश पंडित, नगरसेवक राजेंद्र मराठे, जितेंद्र मराठे, राहुल पाटील, प्रशांत जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा महानगरच्या विविध मंडळांमध्ये बूथ स्तरावर हा कार्यक्रम येणार आहे, असे प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळवले.