जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल चाळीसगाव येथील एक आरोपी उपचार घेत असताना पळून गेल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर रवींद्र चौधरी, रा. शिव कॉलनी याला भा. द. वि. कलम ३७६ मध्ये अटक करण्यात आली होती. परंतु त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. २२ जून पासून त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज सकाळी साडेपाच वाजेपूर्वी संबंधित आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी संबंधित आरोपी कोणाला आढळल्यास त्यांनी नशिराबाद पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.