अमळनेर राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी युवक कॉंग्रसतर्फे जिल्ह्यात विविध तालुक्यात युवक जोडो व संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मूळ उद्देश आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता काळात केलेली लोकोपयोगी कामे व घेतलेले लोकहिताचे निर्णय. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे व जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी एकरूप करणे हा आहे. यासंदर्भात नुकतीच आढावा बैठक आ. अनिल भाईदास पाटील व जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
पक्षवाढीसाठी बूथ कमिट्या मजबूत करण्यासाठी युवकांनी पक्षाशी एकरूप व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान उपस्थित मान्यवरांनी केले. याप्रसंगी जिल्ह्याचे युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, अमळनेर तालुका युवक निरीक्षक राज कोळी, बाळू पाटील, प्रा सुरेश पाटील, विनोद सोनवणे, निलेश देशमुख, विनोद कदम, अंकुश भागवत, गौरव पाटील, गोविंदा बाविस्कर आदी उपस्थित होते.