जळगाव : शहरातील बंद घरांवर चोरट्यांकडून निशाणा साधला जात आहे. स्टेट बँक कॉलनीतील बंद घर फोडून चोरट्याने ८५ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दानिगे, देवांच्या मुर्त्या, टीव्ही आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप आबाजी सोरटे (वय-५७) रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याचे व चांदीचे दागिने, चांदीच्या मुर्त्या, टीव्ही आणि मोबाईल असा एकुण ८५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हा प्रकार १० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आला. प्रदीप सोरटे यांनी मंगळवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता धाव घेवून पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी हे करीत आहे.