पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | येथील आंबील ओढ्यातील काही नागरिकांची घरे पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने नगरींच्या मदतीने आंदोलन केले. पालिकेच्या बाहेर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. पडलेली घरे बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत संवाद साधला.
परंतु त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खा. सुप्रिया सुळेंच्या समोरच ना. अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात कोणतेही राजकारण करू नये असे आवाहन केले. आपण येथे राजकारण करण्यासाठी आले नाही हा विषय संवेदनशीपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही राजकारण न आणता हा प्रश्न मार्गी लावला असेही त्यांनी सांगितले.