जळगाव: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चुकीच्या घोषणाबाजी मुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समाज बांधवांनी अभिवादन केले. या मिरवणुकीत नेहरू चौकात काहींनी चुकीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. पोलिसांनी घोषणा देणाऱ्याची धरपकड सुरू केली आहे.
वादग्रस्त घोषणा
मिरवणुकीत काही तरुणांकडून वाद घालण्यात आला तसेच वादग्रस्त घोषणा देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून मध्यस्ती करण्याचा प्रयत्न होता. मनाई केल्यावर देखील मात्र वाद वाढत असल्याने पोलिसांनी थेट लाठी चार्ज केला आहे. पोलिसांकडून त्या तरुणांची धरपकड सुरू आहे.
अभिवादनासाठी अलोट गर्दी
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर जळगाव देखील आंबेडकर जयंतीचा मोठा प्रमाणात उत्साह आहे विविध भागातून मिरवणुका जळगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला तरुणांचा लक्षणीय सहभाग आहे. मात्र आता तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने या उत्साहावर निरंजन पडल्याचे घटनास्थळी पाहायला मिळत आहे.