पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आंबेडकर जयंती निमित्त झांज पथकात सहभाग
या बसमध्ये 6 मुली व 40 मुले होती. सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झांज पथक ऑर्डर मिळाल्याने पिंपरी-चिंचवडला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर तेथून रात्री एकच्या ते मुंबईला परतत होते. यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्यातील कार्यक्रम संपवून हे सर्वजण परत जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.