यावल : तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला असून यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले आहे. पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली.
तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील महापुरुषांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिक उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे राकेश मानगावकर ,पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत
पोलिसांची घटनास्थळी धाव
रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले.