पाटणा : महसूल विभागासह महिला पोलीस निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांच्या लोकांनी हल्ला केला, मारहाण केली आणि नंतर ओढत नेऊन शिवीगाळ केली. पाटणा येथील दानापूर येथील बिहता पोलीस स्टेशन हद्दीत पाटणा-बिहटा महामार्गावर ही घटना घडवली आहे.
या घटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 44 जणांना अटक केली असून 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या हल्ल्यासंदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून त्यानंतर आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भात पाटणा (पश्चिम)चे एसपी म्हणाले की, सरकारी कर्मचारी जखमी झाले असून महिला निरीक्षकालाही दुखापत झाली आहे. खनिकर्म विभागाच्या संपूर्ण पथकावर वाळू माफियांनी दगडफेक केली. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
पोलिसांकडून अटकसत्र सुरू
पाटणा (पश्चिम) एसपी राजेश कुमार यांनी सांगितले की, माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि छापे टाकत 44 जणांना अटक केली. काही संशयितांची चौकशी सुरू आहे. व्हिडिओ आणि छायाचित्रांवरून लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अटक करण्यात आलेल्या लोकांच्या चौकशीत ज्यांची नावे समोर येत आहेत त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दीडशे ट्रकवर कारवाई
या हल्ल्यात जिल्हा खनिकर्म अधिकारी, 2 खाण निरीक्षकांसह 3 जण जखमी झाले. व्हिडिओमध्ये असभ्य भाषा आणि शिवीगाळ करण्यात आला आहे. खनिकर्म विभागाच्या पथकाने सांगितले की, बिहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारेव गावाजवळ ओव्हरलोड ट्रकची तपासणी करण्यात आली. याठिकाणी सुमारे दीडशे ट्रक ओव्हरलोड करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत होती. दरम्यान, हा हल्ला झाला आणि वाळू माफियांच्या लोकांनी दगडफेक सुरू केली.