मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनी रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, या पत्राने पुन्हा राजकीय चर्चेला उधान सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती.
या पत्रातून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कडून शिवसेना कमजोर केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. व शिवसेनेने भाजपाशी जुळवून घ्यावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. आता विजय शिवतारेंनी ही रुग्नालायातूनच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शिवतारेंनी पुरंदर चे कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रात शिवतारे म्हणतात. गुंजवणी धरण मी राज्यमंत्री असतांना पुरंदर, भोर आणि व्हेले या तीन तालुक्यांना वरदान ठरेल यासाठी पूर्ण केले होते. या धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. त्यासाठी १३१३ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. व्हेले आणि भोरचे काम पूर्ण झाले. परंतु, पुरंदर तालुक्यात काही दिवसांपूर्वी या योजनेचे काम बंद करण्यात आले आहे. स्थानिक आमदार संजय जगताप यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. इतकच नाही तर अधिकाऱ्यांना आमच्या विरोधात करून गुंजवणीचे काम बंद केले आहे. व ते काम स्वतःच्या हस्ते व्हाव यासाठी आमदारांचा आग्रह आहे. हि योजना लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाची समन्वय साधत मी पुरंदर तालुक्यातील जालवाहीने कामास सुरुवात केली. याकामाचे शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावे, तो ऑनलाईन झाला तरी चालेल. अशी इच्छा विजय शिव्तारेंनी पत्रात व्यक्त केली आहे.