अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी अमळनेर शहरात नेहमी अप-डाऊन करत असतात. पण एसटी महामंडळाबाबत अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा मागच्या खेड्यापाडावरून येणारी बस पूर्णपणे गच्च भरून येत असल्याने बस शिरूड बस स्टैंडवर थांबा घेत नाही तर बस ही सरळ निघून जाते.
यामुळे विद्यार्थी व प्रवासी जागेवरच राहून जातात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना पाठ फिरवत घरी जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक विद्यार्थ्यांचे शाळा, क्लासेस, महाविद्यालयात वेळेवर पोहोचत नाही तर त्यांना शाळेला दांडी मारावी लागते. अशा या प्रकारामुळे अनेक वेळा या एसटी वाहन चालक यांच्याशी पालकांचे देखील वाद होत असतात. विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पालकांनी थेट आगार प्रमुखांची संवाद साधला
आज बस थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क बस समोर आडवे होत बस थांबवली याबाबत एसटी वाहक, चालक व पालकांमध्ये देखील वाद झाला ही बाब थेट अमळनेर आगापर्यंत पोहोचली व पालकांनी थेट आगार प्रमुखांची संवाद साधला व समस्या सांगितली याबाबात आगार प्रमुखांनी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी दुसरी बस ही आगारातून पाठवली जवळपास शिरूड थांब्यावर तीस ते पस्तीस विद्यार्थी व विद्यार्थिनी उभे होत आगार व्यवस्थापकांनी बस पाठवल्यामुळे प्रवाशांनी आभार मानले मात्र शालेय विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात वेळेवर न पोचल्याने नाराजी व्यक्त केली आहे.