रावेर (प्रतिनिधी): मतदार संघातील जनतेच्या समस्या सुटाव्या म्हणून सुरु केलेला ‘जनता दरबार’ मागील तीन वर्षापासून आमदार शिरीष चौधरींच्या दुर्लक्षामुळे झाला नाही. यामुळे नागरीकांमध्ये कमालीचा नाराजीचा सुर उमटत आहे. २०२० मध्ये घेतलेला जनता दरबारमध्ये आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती,एसटी महामंडळासह इतर विभागाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या परंतु त्या तक्रारीच पुढे काय झाल याच उत्तर ना आमदारांना देता आल ना अधिकाऱ्यांकडून मिळाले. त्यामुळे नागरीकांची वाढती नाराजी आमदार शिरीष चौधरींसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
रावेर व यावल तालुक्यातील मतदार संघातील जनतेच्या समस्या जलतगतीने सुटाव्या म्हणून आमदार शिरीष चौधरी यांनी २०२० मध्ये ‘जनता दरबार’ आयोजित केला होता. यामध्ये वेग-वेगळ्या विभागा बद्दल जनतेकडून तक्रारींचा पाऊस पडला होता. परंतु नंतर आमदार शिरीष चौधरीचे जनता दरबारकडे जाणून-बुजुण दुर्लक्ष झाले. यामुळे नागरीकांमध्ये कमाली नाराजीचा सुर आहे. रावेर परिसरातील सिटी सर्वे कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग जिल्हा परिषद विभाग,जलसंधारण विभागात ग्रामीण भागातुन वेगवेगळ्या समस्या घेऊन आलेले नागरीकांची फिरवा-फिरव होत असुन त्यात आमदार साहेबांना ‘जनता दरबार’ घेण्यासाठी वेळ मिळत नसल्याने नागरीक कमालीचा हवालदील झाले आहे.
कोरोनामुळे जनता दरबार रद्द होता- आ चौधरी
रावेर व यावल तालुक्यातील नागरीकांच्या समस्या सुटाव्या म्हणून मी ‘जनता दरबार’ सुरु केला होता परंतु मध्यंतरी कोरोना व्हायरस मुळे ‘जनता दरबार’रद्द करावा लागला होता.परंतु जनतेच्या तक्रारी सुटाव्या म्हणून यावर्षी अधिका-यांच्याशी बोलणी करून पुन्हा जनता दरबार सुरु करणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.
आमदारांचे जनतेकडे होतेय दुर्लक्ष
विधानसभा निवडणूक होऊन चार वर्ष होण्यात आली अद्याप युवकांचा रोजगाराची समस्या रावेरसाठी मोठे उद्योगधंदे परिसरात व्यवस्थित रस्ते करण्यात आमदार शिरीष चौधरी सफसेल फेल झाले आहे. त्यांनी फक्त एक वेळा ‘जनता दरबार’ आयोजित केला होता त्यानंतर त्यांचे मतदारांकडे दुर्लक्ष होऊन आपल्या संस्थाकडे लक्ष देण्यात आमदार साहेब जास्त व्यस्त राहील्याची टीका सुरेश पाटील यांनी केली आहे.