जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील दादावाडी जवळील अष्टभुजा देवी मंदिराजवळ पिंपळा येथे आज, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत या कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण महापौर जयश्री महाजन व सरिता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सहसचिव उमाकांत बडगुजर यांनी केलेले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व शिवाजी महाराजांच्या पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भावेश ठाकूर यांनी केले, तर सरिता कोल्हे यांचे स्वागत प्रमिला बोंडे यांनी केले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तिलोत्तमदास बोंडे, उपाध्यक्ष महेश पाटील, सचिव नितीन ठाकूर, शहराध्यक्ष विनय नेहते, हितेश भावसार, ललित राणे, ऋषिकेश पाटील, अमोल चौधरी आदी उपस्थित होते