जळगाव: पिंप्राळा येथील शिवस्मारकाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर स्थळाच्या पहाणीनिमित्त आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पिप्राळा येथे पहाणी केली.
यानंतर खासदार संजय राऊत यांनी जळगाव शहर उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या निवासस्थानी देखील सदिच्छा भेट दिली. यावेळी जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जळगाव शहर महापौर जयश्री महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, माजी नगरसेवक अमर जैन, युवासेने जिल्हा युवा अधिकारी निलेश चौधरी, उपजिल्हा युवाधिकारी विशाल वाणी, विधानसभा क्षेत्र प्रमुख अमित जगतात व शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते.