जळगाव | ”गुलाबराव पाटील हे दगड मारण्याची भाषा करत असले तरी कधी काळी दगड मारणारे हात आज खोक्यांनी भरलेले आहेत !” असा टोला राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मारला. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते. पाचोऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेदरम्यान खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सभेत दुसऱ्याच्या एकदम गुलाबराव पाटील तसेच ठाकरे शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
मालेगाव नंतर प्रथमच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या बहिण असलेल्या शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या सभेचे आयोजन केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारपर्यंत जळगाव जिल्ह्यात दाखल होणारं आहे. त्यांच्या हातून माजी आमदार आ.रो.तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यासोबतच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजित देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे.
दरम्यान, पाचोर्यात होणाऱ्या सभेत त आमच्यावर कोणत्याही पद्धतीची टीका करू नये अशी तबकीच पदरी गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. सध्याचा सभेत घुसू असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यां कडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसणार असल्याचे आव्हान स्वीकारले यासाठी दोनशे वाहनांचा टाका घेऊन सभेसाठी दाखवणार असल्याचे सांगितले आहे. शिंदे गट व ठाकरे गटात मोठा राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुलाबराव पाटील केवळ धमक्या देतात, सभेत घुसण्यासाठी दम लागतो त्यानी घुसून दाखवावे.. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांचा नाहक बळी देऊ नये त्यांनी स्वतः सभेत यावे आम्ही वाट बघतोय, परत जाणार का ? हे त्यांनी बघावे. असा थेट इशारा ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे.