बुलढाणा | गेल्या नऊ महिन्यापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातले नसल्याचा घणाघाती आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने “गुलाबराव पाटील हरवले हो.. असे थेट पोस्टर गावागावात लावत निषेध व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे सर्वच नेते आज जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या स्थानिक गुलाबराव पाटील आहेत. गेल्या दोन दिवसापासून संजय राऊत जळगाव जिल्ह्यात तळ ठोकून आहेत सभेत घुसण्याच्या वादावरून तसेच टिका केल्याच्या वादावरून ठाकरे यांनी शिंदे गटात शाब्दिक चकमक उडाली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवावे असे थेट आव्हान ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात “गुलाबराव पाटील हरवले हो.. याबाबतचे गावागावात पोस्टर लावण्यात आले आहे. यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले असून पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेध म्हणून बुलढाणा येथे आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे गुलाबराव पाटील यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.
शिंदे गटाने देखील जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाचे आव्हान स्वीकारत सभेत घुसण्याचा इशारा दिला आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसण्यावरून यु – टर्न घेत, “अगोदर सभेत सैनिक घुसतील नंतर सरदार घुसेल ” खा. संजय राऊत त्यांनी चौकटीत राहून बोलावे.. असे विधान देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.