जळगाव – पाचोरा| भाजपा – शिवसेना युतीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 मध्ये एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून युती तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आता यापुढे युती वगैरे काही नाही. आता सर्वच स्वातंत्र्य लढणार असे एकनाथ खडसेंनी मला सांगितले होते, युती तोडण्यासाठी खडसेंना पुढे करुन कारस्थान करण्यात आले.
एकनाथ खडसे यांनी युतीबाबत विधान करताना २०१४ पासून युती राहणार नाही आजपासून युतीत होती असे सांगितले होते. “आमचे आता ठरले.. आता काहीही नाही.. असे एकनाथ खडसे बोलले होते, त्या काळात खडसे हे भाजपमध्ये होते युती तोडण्यासाठी त्यांच्या गळ्यात माळ टाकण्यात आली होती. त्यांना पुढे करून युती तोडण्यात आली. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पाचोरा येथे आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा युती तोडण्याच्या विषयात नेमकं काय राजकारण घडलं याचा भांडाफोड केला आहे.
भाजप शिवसेना युतीवरून अनेकदा भाजपाकडून युती तोडण्याला कार्यरणीभूत शिवसेना असल्याचा सांगितले जाते. विधानसभा निवडणूक सोबत लढल्यावर देखील शिवसेनेने भाजपाची साथ सोडत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जात सत्ता स्थापन केली. असे अनेक आरोप भाजपाने त्यांच्याकडून केले जातात. 105 आमदार असताना आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले, याला सर्व स्वीकारणीभूत शिवसेना असल्याचे सांगितले जाते मात्र याला प्रत्युत्तर म्हणून आज पाचोरा येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी नव्या विषयाला वाचा फोडली आहे. यामुळे युती तोडण्यासाठी खडसेंच्या गळ्यात माळ टाकण्यात आली असा गौपयस्फोट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथील सभा राज्यभर चर्चेत राहिली. बंडखोर आमदारांवर सह कडून टीका करी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभेत घुसण्याच्या वक्तव्यावरून मोठे वादंग भेटल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे काही पदाधिकारी सभेत घुसण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांकडून देखील अडवण्यात आले. खासदार संजय राऊत या पाचोराच्या सभेदरम्यान त्यांचे वक्तव्य अधिक चर्चेत राहिले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सह शिंदे – फडणवीस सरकारवर त्यांनी चांगले तोंड सुख घेतले.