(राजमुद्रा धरणगाव) काल दिनांक 5 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. यासंदर्भात धरणगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा तर्फे विरोध दर्शवत आज तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. हा कायदा रद्द झाल्यामुळे मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा दिवस मराठा समाजासाठी काळा दिवस ठरला असून यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. लवकरात लवकर या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा व केंद्र सरकार, राष्ट्रपती तथा राज्य सरकारने मराठा समाजास आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र असे न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि सरकारला आपली जागा दाखवून देईल. आणि या सर्व परिस्थितीला सर्वस्वी सरकार व सर्व राजकीय पक्ष जबाबदार राहतील असा इशाराही देण्यात आलेला आहे.
सदर निवेदन धरणगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार वाडीले यांना सादर केले असून याप्रसंगी चंदन पाटील, भिमराज पाटील, गुलाब मराठे, गोपाल पाटील, माजी नगराध्यक्ष पी एम पाटील, प्राध्यापक मंगेश पाटील, वाल्मिक पाटील, राहुल मराठे, योगेश पाटील, मोहन पाटील, विजय पाटील, विनीत सूर्यवंशी, शामकांत पाटील, अनोरे येथील मराठा प्रतिष्ठानचे हेमंत पाटील, कल्पेश पाटील, हर्षल पाटील, नितीन पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.