रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यात अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी दिवासा तर काही ठिकाणी रात्रीच्या अंधारात अवैध वाळूची सर्रास वाहतूक होत आहे. याकडे तहसीलदार बंडु कापसे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रावेर तालुक्यात अवैध वाळूची सर्रास वाहतूक होत असुन याकडे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. भोकर नदी,सुकी नदी,तापी नदीपात्रातुन मोठी अवैध वाळू वाहतूक होत असते. पाल मार्गे सावदा तर पातोंडी मार्गे रावेरात तर निंभोरासिम मार्गे रावेरच्या दक्षिण भागात वाळू पुरवली जाते तसेच फिल्डवर असलेले तलाठी व मंडळ अधिकारी यांचे याकडे सोइस्कर दुर्लक्ष होत आहे. तसेच एक मंडळ अधिकारी नेमलेल क्षेत्र सोडून नेहमी रावेर स्टेशन रोड दरम्यान वाळू माफियां सोबत बसलेले असतात. त्यांचे अर्थपूर्ण संबध महसूल प्रशासनाची प्रतिमा मलिन करीत आहे.
कारवाईसाठी पथक नियुक्त करणार: तहसिलदार
रावेर तालुक्यातील अवैध वाळुचा प्रश्न हाताळण्यासाठी महसूल प्रशासन लवकरच नवीन पथक नियुक्ती करणार तसेच आहे. त्या पथकांना अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना देण्यात येणार असल्याचे तहसीलदार बंडू कापसे यांनी सांगितले.