राजमुद्रा वृत्तसेवा | बीएचआर घोटाळ्यातील फरार म्हणून घोषित असलेला मुख्य संशयित जितेंद्र कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून आज (ता २८) इंदूरमधून अटक करण्यात आहे.
पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात बीएचआर घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२० मध्ये कारवाई केली होती. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावातही छापे टाकले होते. त्यादरम्यान अवसायक तथा गुन्ह्यातील मुख्य संशयित जितेंद्र कंडारे हा फरार झाला होता. आज तब्बल सात महिन्यांनंत इंदूरमधून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून फरार असलेल्या जितेंद्र कंडारीला अटक करण्यात आली.