मुंबई: व्हॉट्सॲप जगभरात प्रसिद्ध असणारे मेसेजिंग अॅप आहे. कंपनीनं आता आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर लाँच केलंय. आता तुमच एकच अकाउंट चार मोबाईलवरती चालणार आहे. WhatsApp ने मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट लाँच केलं आहे. यामुळे आता युजर्संना एकच अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार आहे.
याअगोदर एकच अकाउंट एक फोनमध्ये आणि वेब व्हॉट्सअपद्वारे पीसीवर वापरता येत होते. आता चार फोनमध्ये एकच अकाउंट वापरता येणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी हे फिचर लाँच करण्याची घोषणा केली आहे.
मार्क झुकेरबर्गने केली घोषणा
“आजपासून तुम्ही एकच WhatsApp अकाउंट चार फोनमध्ये वापरु शकता,” असं मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर काही आठवड्यांत सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची अनेक दिवसांपासून यूजर्स वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा यूजर्ससाठी सुरू करण्यात आले होते.
कुठल्याही मोबाईलवर सुरु करा खाते
नवीन अपडेटच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचे मेसेज आणि चॅट सर्व डिव्हाइसेसवर सिंक करण्यास सक्षम असतील. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी नेहमीच डिव्हाइस सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. WhatsApp चे हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह आले आहे. म्हणजेच अनेक डिव्हाईमध्ये तुम्ही WhatsApp चे अकाउंट वापरु शकता. कंपनी या फिचरला 2021 पासूनच WhatsApp Beta वर टेस्ट करत आहे. काही दिवसापूर्वीच कंपनीने या फिचरला सर्व बीट वापरकर्त्यांसाठी सुरू केलं होतं.
जाणून घ्या प्रक्रिया
– हे फीचर वापरण्यासाठी, तुम्ही अगोदर दोन फोनमध्ये WhatsApp सुरू करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅप उघडल्यावर, तुम्हाला वर दाखवलेल्या हॅम्बर्गर मेनूवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला Link to Existing Account चा पर्याय मिळेल.
– त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर QR Code येईल. आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप उघडावे लागेल आणि लिंक डिव्हाइसेसच्या पर्यायावर जावे लागेल.
– आता तुम्हाला पहिल्या फोनवरून दुसऱ्या फोनवर दाखवलेला QR कोड स्कॅन करावा लागेल. अशाप्रकारे, तुम्ही दोन्ही स्मार्टफोनवर समान WhatsApp खाते वापरू शकता.