जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप सेनेच्या युतीच्या काळात अवयव दानाची ब्रँड अम्बॅसेडर असलेली जळगावच्या जुही पवार या युवतीने मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान काही जणांनी या भेटीचे चुकीचे वृत्त व फोटो सोशल मीडियात व्हायरल केल्याने या भेटीचे खरे राजकारण गुलदस्त्यात असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात जळगाव राजमुद्राशी बोलतांना जुही पवार म्हणाल्या, अवयव दान चळवळ राज्यात वाढावी तिचे महत्व सर्वसामान्य जनतेला कळावे. यासाठी राज्यात पुन्हा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कार्य करण्याची संधी मिळावी म्हणून आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले.
जुही पवार या युवतीने काही वर्षांपूर्वी आपल्या यकृताचा काही भाग वडिलांना दान केल्यानंतर अवयव दान चळवळीला वेग आला. आज समाजात अवयव दानाची गरज आहे. तिचे हे कार्य बघून अनेकांनी तिचे कौतुक केले. तर भाजपा सरकारच्या काळात तिचे जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांच्या शिफारशी वरून तिची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली. आता राज्यात महाआघाडीचे सरकार असून, पुन्हा अवयव दान चळवळीत ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कार्य करण्याची संधी मिळावी म्हणून. शरद पवार यांची भेट घेऊन याबात त्यांना संपूर्ण माहिती दिली असल्याचे तिने सांगितले. मात्र काही जणांच्या सांगण्यावरून माझे फोटो व चुकीचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आल्याने तिने खंत व्यक्त केली.