मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. ईडीने पुन्हा देशमुखांना समन्स बजावत २४ तासात हजर व्हा ! अन्यथा घरी येऊन चौकशी करणार असल्याचा इशारा दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
मंगळवारी देशमुख यांची ईडी कडून चौकशी होणार होती. व त्यासाठी सकाळी ११ वाजता त्यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. मात्र वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचे कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्या ऐवजी व्हिडीओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदविण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. ईडी ने काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले होते. देशमुख यांचेकडेही चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयाची करायची आहे. हे आधी कळवावे. अशी मागणी त्यांनी वकिलांच्या माध्यमातून करून चौकशीला जाण्याचे टाळले.