जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । केंद्र सरकारच्या गॅस व इंधनाच्यादरवाढी विरुद्ध मेहरूण परिसरातील शेरा चौकात युवक व महिलांनी आंदोलन केले. यावेळी गॅस व इंधन दरवाढी बद्दल नागरिकांनी केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. युवक आफिक पटेल यांनी केंद्र सरकारच्या दरवाढ विरोधात देशाची अर्थव्यवस्था खालावत चालल्याची आणि भाजपा सरकारला युवकांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचे सांगत टीका केली. आगामी लोकसभा निवडणुकीत युवक वर्ग हा भाजपाला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी मेहरूण परिसरातील युवक व महिला सहभागी झाले होते.